शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांची संजय खाडे यांना साथ…
काँग्रेस समर्थक निवडणूक लढणार… काँग्रेसचाच बालेकिल्ला…चुरशीची होणार वणी विधानसभा निवडणुक…
AM न्यूज वृत्तांकन, वणी



अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती आणि 4 नोव्हेंबर ला नामांकन परत न घ्यायचा निर्णय घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणूक आता चांगलीच दमदार होणार आहे हे मात्र 100 टक्के सत्य आहे.


भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार, मनसे चे राजू उंबरकर, महाविकास आघाडी शिवसेना उबाठा चे संजय देरकर आणि आता संजय खाडे यांच्यात चुरस वाढली असून या चौरंगी लढती मध्ये कोण जिंकणार, कोण दिवाळी साजरी करणार याची उत्सुकता 23 नोव्हेंबर ला संपणार आहे.



काँग्रेस ला उमेदवारी मिळायला पाहिजे होती हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेला वाटले, मात्र शिवसेनेला मिळाल्याने काँग्रेसमध्ये निराशा आली होती, मात्र काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देऊन लढण्यासाठी शक्ती दिली त्यांना साथ देण्याचे विश्वास दिला. त्यामुळे काँग्रेस समर्थक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे. हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असल्याने काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण-तरुणी सर्व स्त्री पुरुष यांच्यासोबत सलोख्याचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले असून प्रत्येकांची कामे त्यांच्या समस्या संजय खाडे यांनी सोडवले आहे.


आज पत्रकार परिषद मध्ये संजय खाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून ही निवडणूक जिंकणार असे त्यांनी विश्वासाने सांगितले असून त्यांच्यासोबत सर्व जनता काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सोबत आहे आणि जनता त्यांना नक्कीच आशीर्वाद देईल असे यावेळी त्यांनी सांगितले. आता ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून संजय खाडे यांच्यामुळे कोणाला नुकसान होणार हे मात्र 23 नोव्हेंबर ला निकालाच्या दिवशी समजणार आहे.


यावेळी काँग्रेसचे नरेंद्र पाटील ठाकरे, शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत गोहकार, गौरीशंकर खुराना, पुरुषोत्तम आवारी, सुनील वरारकर, प्रा. वऱ्हाटे, तेजराज बोढे यासह मंचावर काँग्रेसचे व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






