AM न्यूज ने घेतलेल्या एक्झीट पोल मध्ये राजू उंबरकर यांना पसंती…
AM न्यूज वृत्तांकन, वणी
विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात शांततेत संपन्न झाले आहे. सगळी कडे चर्चा कोण विजयी होणार ? वणी विधानसभा क्षेत्रात कोण जिंकणार असे ठामपणे कोणी सांगू शकत नाही आहे. मात्र सर्वत्र फक्त अंदाज वर्तविण्यात येत आहे.

AM न्यूज ने घेतलेल्या सर्वेक्षणात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर विजयी होण्याची शकता आहे. तर महविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर दुसऱ्या स्थानावर राहतील असा जनतेचा कौल दिसत आहे.
महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना तिसऱ्या क्रमांकावर जनतेने कौल दिलेला आहे. मात्र भाजप तिसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना सर्वेक्षणात चौथ्या क्रमांकावर आहेत, मात्र शांत संयमी, उत्कृष्ट कार्य असल्याने हे बाजी मारतील का ? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, कारण त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळू शकते असे जाणकारांचे मत आहे.

23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर कोणाचे भाग्य उजळेल हे प्रत्यक्ष निकालानंतर समजणार आहे.




