Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणी बस स्थानकावर बॉम्ब चे रहस्य पोलिसांनी सांगितले…नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास ….

प्रतिनिधी आकाश दुबे, वणी

वणी बस स्थानक येथील वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात ईसमाने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे. अशी माहीती पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे मिळताच यवतमाळ जिल्हयातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचुन कोणतीही जिवित अथवा वित्त हानी होवु न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाव्दारे संपुर्ण घटनास्थळाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली आणि सदर बाँम्ब असलेल्या बॅग ला वणी बस स्थानकातील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन सदर बाँम्ब हा डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करुन निकामी करण्यात आला.

त्यानंतर फॉरेन्सीक लॅबच्या मार्फतीने घटना स्थळावरील भौतीक पुरावे जप्त करण्यात आले. सदर घटने दरम्यान थांबवुन ठेवलेली रस्त्यावरील गर्दी ही वाहतूक पोलीसांच्या मदतीने सुरळीत सुरु करण्यात आली. सदरची कार्यवाही ही पोलीस विभागातर्फेच घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचे पोलीसांतर्फे मेगा फोनव्दारे नागरिकांना सांगण्यात आले.

जिल्हयात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्ब स्फोटाच्या प्रसंगी पोलीसांतर्फे करावयाच्या कार्यपध्दती संबंधाने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 10/08/2024 रोजीचे 12:00 ते 01:00 वाजताच्या दरम्यान वणी बस स्थानक येथे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात आली होती. सदर तालीमेच्या अनुषंगाने वणी बस स्थानकावर प्रात्यक्षिक झाले.

सदरची रंगीत तालीम (मॉक ड्रील) डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, गणेश किंद्रे SDPO वणी, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सारंग बोम्पीलवार, प्रमुख, दहशतवाद विरोधी शाखा, पोउपनि परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोउपनि धवणे, प्रमुख QRT पथक, तसेच पोलीस निरीक्षक अनिल बेहारणे पो.स्टे वणी, स.पो.नि. वाघमारे, वाहतुक शाखा वणी, सपोनि सुरेश परसोडे अंगुलीमुद्रा, वैदयकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.

एखादा बाँम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे याबाबत सदर रंगीत तालीमव्दारे प्रात्यक्षीक करुन दर्शविण्यात आले तसेच नागरीकांनी जागरुक राहुन दहशतवादा संबंधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फो.नं. 07232-242700 व डायल 112 वर संपर्क करुन कळवावे, असे आव्हान यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular