Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

निषेध… निषेध… संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा वणीत तीव्र निषेध…

विधान सभा निवडणूकीत उमेदवाराला फटका बसणार…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

संजय राऊत व्यापाऱ्यान बद्दल काय म्हणाले….

“अमित शाह खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो. तो ग्राहकाला फसवतो,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, “370 कलमाला कोणीही विरोध केलेला नाही. काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नसून, उलट पाठिंबा दिला आहे. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले?”.

विधानसभा निवडणुकाचा प्रचार सध्या सर्वत्र सुरू असून महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर असून संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहे. अशा प्रमुख नेत्यांनी असं अपमानजनक वक्तव्य करणे, योग्य नाही. त्यामुळे केलेल्या विधानाचा उमेदवाराला फटका बसू शकतो. असे चित्र दिसत आहे. कारण वणी विधान सभा क्षेत्रातील सर्व व्यापारी नाराज झाल्याने सर्वांनी या अपमान जनक शब्दांचा तीव्र निषेध केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करताना थेट व्यापाऱ्यांचा अपमान केल्याचं बोललं जात आहे. व्यापारी खोटं बोलतात असंही संजय राऊत म्हणाले असून त्यावरुन आता टीकेची झोड उठली आहे.

वणी येथे मंगळवारी सायंकाळी गांधी चौकात व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी संजय राऊत यांचा ‘निषेध असो निषेध असो’ अशी नारेबाजी केली आणि संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला.


यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजू गुंडावर, सचिव अनिल आक्केवर, लवलेश लाल , दीपक छाजेड़ ,संजय पांडे, संदीप मदान, निखिल केडिया, राजू तिवारी, हेअनुज मुकेवार, रवि निखार, रोशन कटारिया, अनिल सिडाना, प्रदीप खत्री, हेश्री फेरवानी, अंकुश कोटेचा, हितेन अटारा ,प्रमोद कोटेचा, संतोष भेले यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular