आपल्याला पहिले मतदान करून आपण या देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक आहोत हे सिद्ध करायचा आहे.

AM न्यूज वृत्तांकन, वणी
महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. याकरिता सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणा कार्यरत असून मतदान हा आपला हक्क आहे मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने मतदान व मतदार जनजागृती सुरू आहे.

लोकसभेच्या निवडणुका मागील काही महिन्यापूर्वी संपन्न झाल्या त्यामध्ये शंभर टक्के मतदान करण्याकरिता 100% प्रयत्न करण्यात आले मात्र या देशातील नागरिकांनी शंभर टक्के मतदान केले नाही. त्याकरिता जनतेला वारंवार आव्हान करण्यात येते. वणी विधानसभा क्षेत्रात लोकसभेला 60 ते 70 टक्के दरम्यान मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी 100% मतदान करावं याकरिता जनजागृती करणे सुरू आहे.

प्रसिद्ध वारली चित्रकार व महाराष्ट्र पोलीस दल यवतमाळ चे शेखर वांढरे यांनी मतदार जागृत झाला पाहिजे मतदान करणे हे कर्तव्य आहे त्याकरिता विविध वारली चित्राद्वारे जनजागृती करत असतात. जनतेला त्यांनी आवाहन केले आहे की सर्व काम सोडून मतदानाच्या दिवशी देशहिताचं कार्य करून आपलं अनमोल मत योग्य उमेदवाराला मतदान करा. त्यामुळे लोकशाही मजबूत होईल व योग्य सरकार येईल.




