विजय हा जनतेचा व महाविकास आघाडीचा आहे…
AM न्यूज वृत्तांकन, वणी


वणी विधानसभा क्षेत्राची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. निकालाच्या दिवशी कोणी जिंकणार हा विषय रंगला होता. पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आघाडी घेतली होती आणि 20 व्या फेरीपासून आघाडी वाढतच गेली आणि संजय देरकर विजयी झाले.

चौरंगी लढती मध्ये एकूण मतदान…
संजय देरकर 94,579… संजीवरेड्डी बोदकुरवार 78,945… राजू उंबरकर 21,965… संजय खाडे 7,514
संजय देरकर 15,634 मतांनी विजयी झाले आहे.

संजय देरकर यांनी 1999 ला निवडणूक लढण्यास सुरुवात केली आणि अपयशाला खचून न जाता लढत राहिले आणि तब्बल 25 वर्षा नंतर विजय मिळाला. यात त्यांच्या सहचारिणी किरण देरकर यांचा सुद्धा मोलाचं वाटा आहे.




