Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

जल्लोष मित्रांचा…चाळीस वर्षानंतर वर्गमित्र एकत्र भेटणार… एक दिवस मित्रांचा…

दहाव्या वर्गाचा चेहरा आणि आताचा चेहरा ..सर्वांना उत्सुकता

वणी शहरातील नामांकित आदर्श शाळा येथे 29 डिसेंबर 2024 रविवारला आदर्श शाळेत शिकणारे 1983 – 84 च्या दहावीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्र येणार असून या विद्यार्थ्यांनी आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.

हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून विविध जंगी कार्यक्रम या ठिकाणी ते विद्यार्थी करणार आहेत. हे सर्व दहाव्या वर्गात शिकत होते आणि आता तब्बल 40 वर्षानंतर भेटणार आहेत. तर याची उत्सुकता त्या सर्वांना चांगलीच लागली असून सर्वजण सहकुटुंब येणार आहेत आणि ya कार्यक्रमांमध्ये दहाव्या वर्गातील चेहरे आणि तब्बल 40 वर्षानंतर चेहऱ्यामध्ये फरक पडला शरीरयष्टी मध्ये फरक पडला. एक दिवस मित्राचा म्हणून हसायचं आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा व जीवन जगण्याचा आनंद घ्यायचा असा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular