नगर परिषद शाळा क्र. 9 येथे विद्यार्थ्यांन सोबत….
AM न्यूज वृत्तांकन, वणी

लहान मुलं देवाघरची फुलं हे वाक्य सर्वत्र प्रसिद्ध आहे. लहान मुलांसोबत व्यक्ती पूर्णतः रमून जात असतो. मोठा झाल्यानंतर पुन्हा एकदा लहानपण देगा देवा सर्वजण म्हणतात, कारण लहानपणी कुठल्याही गोष्टीची काळजी नसते, कोणती चिंता नसते, फक्त जगायचं, खेळायचं, राहायचं हेच आयुष्य असतं. त्यामुळे लहान मुलांसोबत एक दिवस आनंदात जगायचं, त्यांच्यासोबत खेळायचं असा ध्यास घेऊन ख्याती चोरडिया यांनी नाताळ उत्सव लहान मुलांसोबत साजरा केला.

सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक 9 येथे 25 डिसेंबर हा ख्रिस्ती धर्मियांचा नाताळ सण साजरा करण्यात आला. शाळेमध्ये लहान मुलांनी क्रिसमस ट्री सजवला होता. त्यानंतर चोरडिया परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य भेट देण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व पालक उपस्थित होते.




