प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी, मारेगाव व झरी तालुका येथे संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने श्री.जगन्नाथ महाराज सेवाश्रम, वणी येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. नायक जयंत चौहाण व कारभारी सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वज पूजन व भोगविधी करून मान्यवरांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते मोतीराज जाधव (दिग्रस) यांनी समाजाला संबोधित करतांना समाजातील विविध रुढी, परंपरा व संस्कृती बद्दल सखोल माहिती दिली, व समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले. तसेच संदीप आडे (नायब तहसीलदार मानोरा) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच बंजारा गीतांवर बालगोपालांनी नृत्यकला सादर केले. संत श्री.सेवालाल महाराज जयंती निमित्त शहरातील प्रमुख मार्गे रॅली काढण्यात आली,
यात बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी प्रा.डॉ. विनोद चव्हाण होते. प्रस्ताविक प्रा. संतोष चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश राठोड यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापक ब्रजेश चौहाण यां. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता बंजारा समाजातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.




