AM न्यूज वृत्तांकन, वणी
वणी: 23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीददिन. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता आवारी ट्युटोरियल्स एक अनोखा उपक्रम राबवत आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा होत आहे.

विद्यार्थ्यांनी हे निबंध घरूनच लिहून आणायचे आहेत. हे निबंध 12 मार्च 2025 पर्यंत दुपारी तीन वाजेच्या आत गुरुनगर येथील आवारी ट्युटोरियलच्या कार्यालयात आणून द्यायचे आहेत. निबंधाचा विषय ‘शहीद भगतसिंग’ आहे. निबंधाची भाषा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी राहील. विद्यार्थी यापैकी कोणत्याही एका भाषेत निबंध लिहू शकतात.

विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येतील. तसेच या निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

निबंधाची शब्द मर्यादा 500 असेल. विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, वर्ग, पालकांचा मोबाईल नंबर लिहावा. ही स्पर्धा दोन गटांत होईल. इयत्ता ५वी ते ७वी करिता अ गट आणि इयत्ता ८वी ते १०वी करिता ब गट राहील. स्पर्धेचे प्रवेश शुल्क केवळ 20 रूपये असेल. स्पर्धेच्या अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.

या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण शहीददिनाला 23 मार्चला संस्थेच्या कार्यालयात राहील. अधिक माहितीकरिता 9860915024 या मोबाईल नंबरवर किंवा गुरुनगर येथील आवारी ट्युटोरिअल्स येथे संपर्क करावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.




