Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

जनता विद्यालय वणीचे घवघवीत यश, यशाची परंपरा कायम…

अनुराधा अरविंद महालक्ष्मे 98.20% घेऊन तीनही तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त….

अनुराधा महालक्ष्मे, यश कावडे, ओम पानघाटे या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये जनता विद्यालय वणी चा निकाल 87.67% लागला असून या परीक्षेला बसलेले विद्यार्थी 349 त्यापैकी प्रथम श्रेणीत 110, द्वितीय श्रेणीत 144, तृतीय 52, अनुत्तीर्ण 43 झालेले आहेत. विद्यालयातून व वणी, झरी, मारेगाव तालुक्यातून अनुराधा अरविंद महालक्ष्मे 98.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक यश राजू कावडे 95.80% तृतीय क्रमांक ओम संतोष पानघाटे 93.80% चतुर्थ क्रमांक शिवाणी निर्दोष ठेंगणे 91.80% वैदही शंकर सोयाम 89.40% स्वाती नानाजी वासेकर 89.40% विद्या विनोद रहाटे 89.00% साईप्रसाद हर्षवर्धन सूर 87.80% आस्था सुनील गौरकर 86.40% स्नेहल चंद्रशेखर पाचभाई 86.40% मानसी विठ्ठल झाडे 85.80% सृष्टी वसंता थेटे 85.20% गुण प्राप्त केले आहे.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अशोकराव जीवतोडे, सचिव, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोकराव जीवतोडे, उपाध्यक्ष अंबर अशोकराव जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयच्या मुख्याध्यापिका मंगला जोगी, उपमुख्याध्यापक गुलाब भोयर, पर्यवेक्षक उत्तम हांडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन भरभरून कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular