Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

विविध संस्थेद्वारा गुणवंतांचा सन्मान संपन्न…

10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी


येथील नगर वाचनालय, मित्र मंडळ, विदर्भ साहित्य संघ व प्रेस वेल्फेअर असोसिएशन या संस्थे मार्फत दिनांक 10 जूनला नगर वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी उत्तम गेडाम हे उपस्थित होते. बक्षीस वितरक म्हणून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक निरंजन पवार, अतिथी म्हणून प्रेस वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष रवी बेलुरकर, नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार हे उपस्थित होते.


वणी शहरातील इयत्ता 10 वी12 वी मध्ये प्रत्येक विद्यालयातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बक्षीस वितरक निरंजन पवार यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून आपल्या नावासह आईवडील व देशाच नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


अध्यक्षीय भाषण करताना उत्तम गेडाम यांनी गुणवंतांना आपल्या देशातील प्रतिभावंतसोबत जागतिक स्पर्धेत उतरून जगातील प्रतिभावंतांशी स्पर्धा करण्यासाठी समोर यावे. तशी प्रतिभा आपल्यामध्ये आहे. असे बोलून विविध उदाहरना द्वारें या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. आभार प्रदर्शन रवी बेलुरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular