Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

लाडक्या बहिणींना सुविधा कधी देणार ? वारंवार मागणी करून निराशा…. आता फक्त आंदोलन….

1) छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी 2)साई मंदिर चौक वणी 3)डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक 4)महात्मा गांधी चौक…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

लाडक्या बहिणीने मुख्यधिकारी यांना निवेदन देऊन महिलांच्या सुविधाचा विचार करता मागणी पूर्ण करा…

वणी नगरपरिषद शहरात जवळपास 80 हजार लोकसंख्या असेलेली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून शहरी व ग्रामीण भागातील महीला प्रतिदिन बाजार हाटासाठी खरेदी-विकी साठी शहरात येत असतात. तसेच वणीत मोठ्या स्वरूपात धार्मिक, व सण-सुदी मध्ये कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा असतात. शहरातील मुख्य चौकात वर्दीळीच्या ठिकाणी बजारपेठ असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महीलांना महीला प्रसाधनगृह’ नसल्या मुळे महिला वर्गाची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे… ह्या कडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहेत.

  • अलिकडे शासन महीलांना लाडक्या बहिणींचा मान देत आहे. पण महीलांच्या प्राथमिक सुख सोयी व सुविधेकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील 11 वर्षात विकासाचा महापूर वणी शहरात आला विकास कामे केली मग महिला प्रसाधन गृहा साठी आपल्या कडे निधी नाही का? याबाबत शंकाआहेत.. असा सवाल उपस्थित होत आहेत.
  • नगर परिषदेकडे वारंवार निवेदन तक्रारी देऊनही सुद्धा महिलांच्या प्राथमिक गरजेकडे प्रशासनाचे उदासीन धोरन दिसत आहेत दिसत आहे.
  • आपण हा विषय गंभीर्याने घेऊन महिला साठी महिला प्रसाधन गृहाची निर्मिती करण्यात यावी… अन्यथा पर्यायी आम्हाला नगरपरिषद प्रशासन विरोधात नारी शक्तीला सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल यांची नोंद घ्यावी.. यावेळी वृषाली खानझोडे, पूजा पानघाटे, शिला मेश्राम, पुष्पाताई आत्राम,ईशा ठाकुरवार,मंदा सोनारखन, सुवर्णा चतुर, उज्वला कोवे, ललिता खैरे, कांचन सिडाम, पौर्णिमा तूराणकर, महिला उपस्थित होत्या.

शहरी व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने वणी शहरात बाजारात खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात सुद्धा त्याच्या स्वरूपात वाढ होते. पण याच महिलासाठी वनी परिसरात कुठेच महिला प्रसाधनगृह नसावे ही शोकांतिका आहे विकासाच्या नावाने आरोळ्या ठोकणाऱ्या सर्व जनप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महिलांच्या प्राथमिक सुख सुविधीकडे दुर्लक्ष करावे यापैकी दुसरे दुर्दैव काय होऊ शकते म्हणून या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मुख्याधिकारी यांनी चौका- चौकात जागेची पाहणी करून महिला प्रसाधनगृहाची निर्मिती करावी अन्यथा येत्या महिन्याभरात वणी व ग्रामीण महिला शक्ती रस्त्यावर उतरून आंदोलन करील…”
वृषाली प्रवीण खानझोडे माजी उपसभापती पं. स. वणी

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular