Thursday, October 15, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज टप्पू सेना वणीत…

मनसेच्या गरब्यात थेट गोकुळधाम सोसायटीची एंट्री

‘तारक मेहता’ मालिकेतील टप्पू , सोनू, पिंकू, गोगी वणीकरांशी साधणार संवाद; उत्साहाचा पारा वाढला.

AM news24 वृत्तांकन, वणी


नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, वणी शहरात एक मोठी पर्वणी मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या २०२५ च्या मनसे गरबा महोत्सवात उद्या, रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी, संपूर्ण देशाचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील ‘टप्पू सेने’चे कलाकार सहभागी होणार आहेत.


टप्पू, सोनू, पिंकू आणि गोगी हे तरुण कलाकार वणी येथील राम शेवाळकर परिसरात आयोजित या महोत्सवात हजेरी लावणार असून, गरबा खेळणाऱ्या स्पर्धकांमध्ये आणि वणीकर जनतेत त्यांच्या भेटीसाठी प्रचंड उत्सुकता आहे.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी आयोजित केलेला हा भव्य कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.

मनसे नेते राजू उंबरकर यांनी या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “गरबा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि समाजाला एकत्र आणणे हा मुख्य हेतू आहे.”
यापूर्वी, शुक्रवारच्या कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे या उपक्रमाला मोठी प्रसिद्धी मिळाली. आता ‘टप्पू सेने’च्या कलाकारांच्या सहभागामुळे हा सांस्कृतिक जागर चिमुकल्यांसह युवा वर्गासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या नृत्यांनी सजलेला हा महोत्सव स्थानिक कलाकार, नृत्य गट आणि सामान्य नागरिकांसाठी एक व्यासपीठ ठरला आहे. टीव्हीवरील लाडक्या पात्रांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाल्याने, उद्या वणीकरांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. वणी पोलीस प्रशासनाने यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular