Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

जयश्री भादेकर नगराध्यक्ष पदासाठी लढणार…

AM न्यूज 24 वृत्तांकन, वणी

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व राजकीय पक्ष व उमेदवार कामाला जोमात लागले आहे. आणि आरक्षण जाहीर झाल्यापासून उमेदवार शोधण्यासाठी सक्षम, उत्कृष्ट कोण आहे, याची पडताळणी सुरु झाली असून काही नावे चर्चेत आले आहे.

वणी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा अनुसूचित जमाती (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वणी नगर परिषदेला अनुसूचित जमातीतील महिला नगराध्यक्षा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष योग्य, सुशिक्षित आणि लोकाभिमुख उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहेत.

जयश्री दयालाल भादेकर ( जयश्री रमेश चांदेकर ) यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुशिक्षित असून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांची सुसंस्कृत पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता आणि लोकांशी साधलेला थेट संपर्क पाहता त्या नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम, सुयोग्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.

जयश्री दयालाल भादेकर ( जयश्री रमेश चांदेकर ) यांच्या उमेदवारी बाबत स्थानिक निवडणुकी साठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांची विशिष्ट ओळख असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी निघाल्याने राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular