Tuesday, October 27, 2026
Google search engine
spot_imgspot_img

हिंदू समाजाची शक्ती संघटित करून राष्ट्राला परमवैभवाप्रत न्यावे – पंजाबराव अव्हाडेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वणीत १०१ वा विजयादशमी उत्सव उत्साहात

: हिंदू समाजातील संघटित करून चारित्र्य, संयम आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर भारतमातेला परमवैभवाप्रत नेणे आवश्यक आहे. शाखेच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन संघाचे प्रांत सहशारीरिक प्रमुख पंजाबराव अव्हाडे यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०१ व्या वर्षानिमित्त शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी वणीतील एसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अव्हाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक कावडे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत आणि नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते.

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रउभारणीचा मार्गसंघाच्या १०१ वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत अव्हाडे यांनी संघटनशक्तीसोबत बौद्धिक विकास आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता अधोरेखित केली. भगवा ध्वज हा प्रेरणेचा स्रोत असून, मन, मनगट आणि बुद्धी यांचा समतोल विकास झाल्याशिवाय राष्ट्राची सर्वांगीण प्रगती शक्य नाही, असे ते म्हणाले.हिंदू संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानले जाते, तर धर्म आणि सांस्कृतिक मूल्यांना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. हिंदुत्व हा आपल्या जीवनपद्धतीचा स्वभाव असून, सांस्कृतिक स्वत्वाचे भान टिकविणे गरजेचे आहे. समाजाच्या सर्व स्तरांत ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार रुजविण्यासोबतच कुटुंबसंस्थेचे महत्त्व जपले पाहिजे. पंचपरिवर्तनाची सुरुवात प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरातून होणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.समाजाचे स्वास्थ्यही शरीराइतकेच महत्त्वाचे – डॉ. प्रतीक कावडे अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रतीक कावडे यांनी विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय दर्शविणारा आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा सण असल्याचे सांगितले. मानवी शरीरात २०६ हाडे असून, एखादा सांधा कमकुवत झाल्यास शरीराच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे समाजातील परस्पर सामंजस्याचे सांधे कमकुवत झाल्यास सामाजिक स्वास्थ्य बिघडते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची रुजवण करून त्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. शारीरिक आरोग्याप्रमाणेच सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी परस्पर सहकार्य आणि राष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शस्त्रपूजन आणि सामूहिक कवायतीने उत्सवाची रंगतकार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके आणि सामूहिक कवायत सादर करण्यात आली. नगर संघचालक किरण बुजोने यांनी प्रास्ताविक केले. श्रेयश धगडी यांनी सुभाषित, तर आदित्य पांडे यांनी अमृतवचन सादर केले. प्रवीण सातपुते यांनी वैयक्तिक गीत गायले, तर कृष्णकुमार पानेरी यांनी सांघिक गीत घेतले. प्रसाद चिडले यांनी उत्सवाचे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात उत्सवाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular