सर्व कंपन्यांचे दर वाढणार….ग्राहकांच्या खिशाला मोठ्ठी कात्री …
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी 9921031427

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सर्वजण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत मोबाईलचा व इंटरनेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. 2G, 3G, 4G नंतर 5G आले आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागणार आहे. 40, 50, 60, 70 रुपये आता रिचार्ज साठी जास्त मोजावे लागणार आहे. जो ग्राहक दर महिन्याला 209 रुपयाचे रिचार्ज करत असेल त्या ग्राहकाला 3 जुलै पासून 249 रुपयाचे रिचार्ज करावे लागणार आहे. मोबाईल वापरणे ही काळाची गरज असल्याने ग्राहकांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.




