Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

एकनिष्ठ मावळा पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस होणार दणक्यात साजरा…

विदर्भातील लाखो महाराष्ट्र सैनिक वणी शहरातील शिवतीर्थ येथे येणार…

AM न्यूज वृत्तांकन

विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख चेहरा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विश्वासू म्हणून ओळख असणारे पक्षनेते राजू उंबरकर यांचा १ जुलै रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त विदर्भातील लाखो महाराष्ट्र सैनिक वणीत दाखल होत असतात. सायंकाळी ७ वाजता शहरातील शिवतीर्थ येथे अभिष्टचिंतन सोहळा तर वाढदिवसानिमित्त दिवसभर विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी उंबरकर यांचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार असल्याची चर्चा आहे.

सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांपासून ते प्रशासनाला धारेवर धरण्यापर्यंत उंबरकर यांचा प्रत्येक क्षेत्रात दबदबा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे यांच्या सोबत असलेला एकनिष्ठ मावळा म्हणून पक्ष सोबतच संबंध महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विविध निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, युवती सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आजवर आवाज उठवला आहे.

सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता वणी शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी राजू उंबरकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे, असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कळविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular