Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

मार्डी येथे हजारो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ… विजय चोरडिया यांचा स्तुत्य उपक्रम…

गरिबांन साठी विजय चोरडिया देवदूत… रुग्णांनी मानले विशेष आभार….

AM न्यूज वृत्तांकन, मार्डी

आजच्या काळामध्ये अनेक आजार नागरिकांना होतात तसेच हा महागाईचा काळ असून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आजारांचा इलाज करणे शक्य होत नाही म्हणून मानवी सेवा हे व्रत स्वीकारून अनेकांना मदत करणारे, देवभक्ती करणारे, गरिबांचे मसीहा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे, ज्यांचं नाव सर्व ठिकाणी आदराने घेण्यात येते असे विजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे पारसमल चोरडिया फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये हजारो नागरिकांनी शिबिरात तपासणी केली असून ज्यांची नेत्र तपासणी झाली व त्यांची शस्त्रक्रिया करावी लागत होती अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे. या सर्व गोष्टीला लागणारा खर्च विजय चोरडिया यांनी केला आहे. सेवाग्राम येथे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेला येण्या-जाण्याचा साठी राहण्याची जीवनाची व्यवस्था आयोजकांना तर्फे करण्यात आलेली आहे.

दरवर्षी पारसमल चोरडिया फाऊंडेशन तर्फे विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मार्डी येथे झालेल्या या शिबिरामध्ये सर्व रुग्णांनी याचा लाभ घेतला असून विजय चोरडिया यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच त्या परिसरातील असलेल्या समस्या यांचे निराकरण झाले पाहिजे आणि विविध समस्येबाबत तेथील ग्रामस्थ
पुढार्‍यांनी चर्चा करून त्या सर्वांना समस्येचे निराकरण करणार असे विजय चोरडिया यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular