प्रतिनिधी: आकाश दुबे, वणी
रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ स्थानिक एस.बी हॉल मध्ये पार पडला. प्रा. डॉ. परेश पटेल यांनी अध्यक्ष व धवन अग्रवाल यांनी सचिव पदाची शपथ घेतली.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजे संग्राम सिंग भोसले, प्रमुख अतिथी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. जुगल चिराणीया, किशोर राठी, महेश पोद्दार उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष आशिष गुप्ता यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. परेश पटेल यांना रोटरी कॉलर पिन तसेच हॅमर देऊन अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. मावळते सचिव अश्विन कोंडावार यांनी सचिव धवन अग्रवाल यांना कॉलर पिन देऊन पदभार सोपवला. अध्यक्ष आशिष गुप्ता यांनी क्लबद्वारे गतवर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा सर्व मान्यवर व सदस्यांना माहिती दिली.

डॉक्टर परेश पटेल यांनी यावेळी नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टरची घोषणा केली. यामध्ये सहसचिव गौरव जोबनपुत्रा, कोषाध्यक्ष अचल जोबनपुत्रा, संजय छाजेड, असलम चिनी, मयूर गेडाम, लक्ष्मण उरकुडे, हिमांशू बत्रा, प्रकाश कवाडे, शहाबुद्दीन आजाणी, अंकुश भंडारी, विजय अग्रवाल, विनोद बाजोरिया आहे. माजी अध्यक्ष अरुण कावडकर, संदीप जयस्वाल, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार, निखिल केडिया, विनोद खुराना, निकेत गुप्ता तर सदस्य म्हणून श्रेयस निखार, रुद्र ताटेवार, प्रा.डॉ अभिजीत अणे, राज बैदमुथा, नवीन जैन, अनिल झाबक, शुभम मदान, राजेश राठी, डॉ सुनील जुमनाके, मयूर अग्रवाल, गौरव गोयल, सुनील चिंडालिया, मनीष बत्रा, शुभम सांड, पुनीत बत्रा, जितू फेरवानी, मुकेश काठेड, विनोद मुथा, कस्तुभ लाखे, डॉ किशोर चवने, विजय बिलोरीया, मनीषा खुराना, स्वाती पटेल, हजरा चिनी, शिल्पी जयस्वाल, आरती उत्तरवार, शालू गुप्ता, अंशुमा झाबक, प्रिया केडिया, दिशा फेरवानी आहे.





