Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

पक्ष प्रवेश कामाचा की नावाचा… निवडणुका आल्या म्हणून वर्चस्वासाठी पक्षप्रवेश आहे का ?

AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा सप्ताह जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधून शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर स्वतःच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षप्रवेश करून घेत आहे. ही जरी पक्ष बळकटीसाठी आनंदाची बाब असेल, तरी पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते हे खरंच एक निष्ठ राहून कार्य करतील का ? की फक्त नावासाठी पक्षांमध्ये प्रवेश करून नाममात्र पक्ष बळकट होत आहे.

संजय देरकर यांनी यापूर्वी वणी विधानसभा क्षेत्रात 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहून 25045 मतदान मिळाले होते. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यावर खरंच विजयी होणार का ? हा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण अनेक वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांनी पक्षाचं काम केलं आहे, असे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, पक्षनिष्ठ संजय निखाडे हे संजय देरकर यांना शिवसेने कडून उमेदवारी मिळाल्यावर निवडून येण्यासाठी मदत करतील का ? असा प्रश्न निर्माण होतो.

जर शिवसेनेकडून संजय देरकर यांना वणी विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी मिळाली नाही तर संजय देरकर पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले तर त्यावेळेस त्यांना कोणते कार्यकर्ते मदत करणार, कारण त्यांचे समर्थक तर शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मग ते पण पक्ष सोडून बंड करतील का ? असाही प्रश्न येथे उपस्थित होतो आहे. त्यामुळे संजय देरकर जरी आज व काल शिवसेना पक्षासाठी मागील काही महिन्यापासून खूप जोमाने कार्य करत असले तरीही येणारी वेळच काय ते ठरवणार आहे. सध्या तरी भगवा सप्ताह द्वारे जोमाने कार्य करून पक्ष बळकट करण्यासाठी कामाचे किंवा नावाचे कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश करून स्वतःची उमेदवारी पक्की करण्यासाठी धडपड सुरू आहे. हे मात्र मतदार राजाला चांगलच माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular