अनेक मुद्द्यावर गाजणार वणीची सभा… नागरिकांना सभेला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन…

सर्वात प्रथम उमेदवार म्हणून राजू उंबरकर यांची घोषणा करण्यात आली तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नंतर लगेच पहिला उमेदवारी अर्ज भरणारे मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर हे आहे आणि आता वणी शहरात राजू उंबरकर यांच्या प्रचाराची पहिली सभा सुद्धा त्यांचीच होत आहे.

पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांच्या प्रचारार्थ आता राज ठाकरे यांची विदर्भात पहिली सभा येत्या ५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. वणीतील शासकिय मैदानात पाण्याच्या टाकीजवळ या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार तोफा राज्यात धडाडणार आहेत यामध्ये सद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेत विदर्भात पहिली प्रचार सभा वणी विधानसभा मतदार संघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवार ला सायंकाळी ६ वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने या सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे करण्यात आले आहे.


यावेळी राज ठाकरे राजु उंबरकर यांच्या सह जिल्ह्यातील उमरखेड,राळेगाव,पुसद येथील मनसे उमेदवारांचा सुध्दा प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहेत.









