Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष….

नामांकन कायम ठेवले तर निवडणूक होणार चुरशीची…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

विधानसभा निवडणूक आता चांगलीच दमदार होणार यात तीळमात्र शंका नाही. काँग्रेसचे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे.

महाविकास आघाडी कडून विधानसभा क्षेत्राची उमेदवारी शिवसेना उबाठा चे संजय देरकर यांना मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वणी विधानसभा क्षेत्र असल्याने काँग्रेसलाच उमेदवारी मिळायला पाहिजे असे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मत आहे.

दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ला नामांकन अर्ज परत घेण्याचा अंतिम दिवस असल्याने संजय खाडे कोणता निर्णय घेणार याकडे वणी विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे संजय खाडे यांनी तळागाळातील सर्व सामान्य माणसांची नाते जोडून आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या असलेल्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत. त्यामुळे सर्वांकडून संजय खाडे यांनी ही निवडणूक लढावी असा आग्रह धरण्यात येत आहे. संजय खाडे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे आपल्याला नामांकन परत घेण्याचे अंतिम दिवशी समजणार आहे. जर संजय खाडे यांनी निवडणुकीमध्ये नामांकन परत घेतले तर महाविकास आघाडी साठी निवडणूक सोपी जाईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

जर त्यांनी नामांकन कायम ठेवले तर होणारी निवडणूक अतिशय चुरशीची होईल यात कोणतीही शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular