आज वणी येथे राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सभा…
AM न्यूज वृत्तांकन, वणी

आज सायंकाळी 6.00 वाजता मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराकरिता मनसे प्रमुख राज ठाकरे वणीच्या शासकीय मैदानावर त्यांची सभा आहे आणि या सभेत काय बोलणार त्यांची तोफ कशी चालणार, सत्ताधाऱ्यांचा समाचार कसा घेणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

आपल्या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न आहे. जे अजूनही सुटलेले नाहीत आणि राज ठाकरे यांची सभा ही सत्याधरांना टोचणारी असते. कारण मनसे प्रमुख राज ठाकरे सत्य परिस्थितीवर बोलतात. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात बेरोजगारी, प्रदूषण, आरोग्य, शैक्षणिक, विद्यार्थ्यांकरिता बसेस, पाण्याचा गंभीर प्रश्न, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, या भागातील रस्ते बरोबर नाही, पांदन रस्ते नाही शेतकऱ्यांकरिता विजेचा प्रश्न नेहमी ऐरणीवरच असतो.












असे अनेक प्रश्नांवर आज राज ठाकरे यांची तोफ चालणार आहे. त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना मतदारांनी प्रत्येक तरुण तरुणी, स्त्री-पुरुषांनी या सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांनी केले आहे.





