Sunday, July 26, 2026
Google search engine
spot_imgspot_img

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता द्या.. राजू उंबरकर ला निवडून द्याल तरच काहीतरी भलं होईल… राज ठाकरे….

तुम्ही सगळ्यांनाच संधी दिली आणि वाटोळ करून घेतलं… आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून द्या मग पहा कसा दुरुस्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा वणी येथील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आली होती, या सभेत राज ठाकरे कडाडले. त्यांनी चौफेर प्रश्न मांडताना मतदारांना विचार करायला भाग पाडून सत्य परिस्थिती काय आहे, हे आपल्या जाहीर सभेत सांगितलं.

तुम्ही मतदान करता आणि निवडून देता, आता विचार करा आपल्या पोरांना रोजगार नाही, त्यांच्या हाताला काम नाही. तुम्ही कधी प्रश्न विचारला आहे. तुमच्या आमदाराला किंवा इतर नेत्यांना, त्यांची मुलं काय करतात. प्रश्न विचारा तुमच्या आमदारला साहेबाची मुलं मुली पुण्या मुंबईत राहतात, शिकतात आणि तुम्ही समजून घ्या माझं काय म्हणणं आहे.

यवतमाळ जिल्ह्याची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जगात ओळख आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवता विचार करा. 95 टक्के यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे. तुम्ही मतदान करता तुमच्या मताला किंमत नाही. राजकारणी सर्व वस्तूंची किंमत ठरवतात, टॅक्स तुम्ही भरता टॅक्स ते ठरवतात. पाणी कर तुम्ही ते ठरवतात, तुमच्या आयुष्यातील पाच पाच वर्ष निघून जातात, हे लोक तुमच्याशी खेळतात, तुम्हाला समजत कसं नाही. कधी प्रश्न विचारता तुम्ही त्यांना की फक्त मतदान करतात.

उघड्या डोळ्यांनी मतदान करा तुम्हाला फसवत आहे. मागील पाच वर्ष आठवून बघा, तुम्ही भाजप सेनेला मतदान केलं होतं आणि त्यांनी काय केलं, त्यांचे दोन गट तयार झाले. दोन्ही वेगवेगळ्या विचारांचे, काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे विचार, भाजप शिवसेना वेगळे विचार आणि यांनी काय केलं तर आपली घरे भरली. ज्यांच्या मांड्या यांना सहन होत नव्हत्या त्यांच्या मांडीपासून दूर झाले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले, त्यांच्याच मांडीत हे जाऊन बसले.

व्याभिचार करायचा म्हणजे किती करायचा, पुण्या मुंबईकडे मोठमोठे होर्डिंग्स लागले त्यात लिहिलं होतं, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे च्या ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे अस लिहन सुरू झालं. तुम्ही मतदान कोणाला केलं शिवसेना भाजपला केलं आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. विचार करा तुम्ही मतदान कोणत्या विचारधारेला केलं आणि हे कोणत्या विचारधारेसोबत जाऊन बसले. फक्त सत्तेवर बसण्यासाठी बसलेले आहे. मतदारांची काहीही किंमत नाही. तुमची कवडीची किंमत नाही. तुम्ही फक्त मतदान करा, तुम्ही मेले तरी चालेल आम्ही सत्ताच बघू जनता गेली खड्ड्यात. यांना तुमची काही किंमत नाही. यांना फक्त तुम्ही मतदान करायचं आणि यांनी वाटेल त्या पक्षात जायचं वाटेल त्यांच्यासोबत सत्ता मिळवायची आणि मंत्रीपद भोगायचं असं आहे.

अरे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा यांची राजकीय खेळी सुरू आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही त्यांची लायकी दाखवाल तेव्हाच हे सुधारतील नाहीतर, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. आज माझा ग्रामीण भागातला तरुण-तरुणी यांना रोजगार पाहिजे आहे. ग्रामीण भागात रोजगार नाही, शहरात गेलं तेथेही रोजगार नाही.

तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोजगार निर्माण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार होता आणि त्याच्या जाहिराती परप्रांतीच्या राज्यांमध्ये काढल्या होत्या आणि ते सर्व आपल्या राज्यात येऊन परीक्षा देत होते आणि आम्ही ते आंदोलन केलं तेव्हापासून हे सगळे सरळ झाले. हजारो पोर त्या आंदोलनानंतर रेल्वेत नौकरीला लागले, हे आम्ही काम केलं.

या सरकार ने आमच्या लोकांवर केसेस टाकल्या का ? हनुमान चालीसा म्हटलं म्हणून 17000 लोकांवर यांनी केसेस लावल्या. जे सरकारने करायला पाहिजे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. सरकारने करायला पाहिजे ते केलं नाही, मग सरकार काय करते, फक्त दल बदलतात सत्ता भोगतात. अशा सरकारला निवडून देण्यात काही अर्थ नाही, विचार करा तुम्ही, आपण काय केलं पाहिजे. चोरांना निवडून द्यायचं की काम करणाऱ्यांना निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे ?

विचार करा तुम्ही आमच्या हातात सत्ता नसताना सुद्धा आम्ही जनतेसाठी काय करू शकतो, जर तुम्ही उद्या आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही हा महाराष्ट्र वेगळा घडवू शकतो. तुमच्या मुलांना रोजगार देऊ शकतो, अनेक समस्या दूर करू शकतो. तुम्ही सगळ्यांना आजपर्यंत संधी देवून तुम्ही आपलं वाटोळ करून घेतला ना, आता एकदा संधी द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभा करण्यापेक्षा त्यांचे गड किल्ले चांगले करा,हेच आमचे खरे स्मारक आहेत, पुतळे कसले उभे करता. सिंधुदुर्ग मध्ये पुतळा उभा केला आणि तो लवकरच पडला कारण निवडणुका येत आहेत लवकर बांधा आणि बसले घेऊन.

मी इथं भाषण करायला आलेलो नाही आहे मी तुम्हाला जागा करायला आलो आहे मागचे पाच वर्षे आठवून बघा काय झालाय. अरे बदल करा तरच आपलं काहीतरी भवितव्य आहे. येणारी जी निवडणूक आहे. मतदान ज्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला बदला घ्यायचा आहे, मतदान करून बदला घ्या. हीच खरी वेळ आहे.

असे वेगवेगळे विषयांवर प्रकाश टाकून मतदारांना सत्ताधाऱ्यांचा चुका सांगितल्या. त्यांनी मतदारांना बोलून सत्य परिस्थिती जाहीर सभेत मांडली. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान करताना राजू उंबरकर यांना निवडून द्या असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular