अकोल्यातील डॉ. पं.दे. कृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य 2024 महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव…
AM न्यूज वृत्तांकन, वणी 9028903511

महाराष्ट्र राज्याचा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा ने 20 व्या युवा महोत्सवाचे आयोजन केले असून उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. शरद गडाख होते तसेच सिने अभिनेता व हास्य कलावंत गौरव मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर पर्यंत होणार असून यात एकांकिका, स्किट, मुकअभिनय, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, नक्कल, सुगम संगीत, शास्त्रीय गायन आणि इतर स्पर्धा होणार आहे. या सपर्धेची सुरुवात भारतीय लोकसंगीत वाद्य या स्पर्धेने सुरुवात झाली. या स्पर्धेत सोलापूर, मुंबई, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक, अमरावती, सातारा, राहुरी, संभाजीनगर,आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, कोल्हापूर, पुणे असे एकूण 8 विद्यापीठाने सहभाग घेतला होता. यामध्ये मुलं मुली यांनी टाळ, चिपळ्या, झांज, घुंगरू, डफ, डफली पखवाज, ढोल, नाल, संबळ बासरी या पारंपारिक वाद्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आणि यातील स्पर्धकांनी एकापेक्षा एक वादन करून उपस्थित रसिक आणि तरुणांना तालावर थिरकविले.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय गायक व गिटारिस्ट पिंकू जोसेफ हे नागपूर विद्यापीठातून युवा महोत्सवात घडले आणि विद्यापीठ स्तरीय इंद्रधनुष्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून विद्यापीठाचे व स्वतःचा नावलौकिक प्राप्त केला. झालेल्या स्पर्धेत त्यांनी परीक्षण केले असून गिटार वर चुरालिया है तुमको, ओहो जाने जाना धुंडे तुझे दिवाना, ये दोस्ती हम नही तोडेंगे अशा वेगवेगळ्या धून वाजवून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर गिटार वाजवून गायन केले आणि उपस्थित सर्व तरुण तरुणींना आपल्या अदाकारीने सगळ्यांना नृत्य करण्यास भाग पाडले.

उद्घाटनिय कार्यक्रमाच्या पूर्वी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्येक विद्यापीठाने दिंडी द्वारे त्या भागातील विविध कलेचे दर्शन व अभिनया द्वारे दाखवले. शोभायात्रा समितीचे प्रमुख कृषी विद्यापीठाचे पथालॉजी विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मोहन तोटावार यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. विद्यार्थी विकास परिषदेचे संचालक डॉ. संदीप हाडोळे, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांनी इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केले आहे.





