Sunday, July 26, 2026
Google search engine
spot_imgspot_img

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजन करून संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात….

रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष, हजारो लोकांचा सहभाग भांदेवाडा येथून ग्रामीण भागाचा प्रचार शुभारंभ…
रॅलीत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व शिवसैनिक सहभागी

काँग्रेसचे संजय काळे यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहे त्यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. तर भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथे दर्शन घेऊन ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ केला. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह नरेंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचाराच्या शुभारंभानंतर रंगनाथ स्वामी मंदिर ते जैताई मंदिर पर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली होती. या मध्ये हजारो समर्थकांनी सहभाग घेतला असून वणीकरांचे लक्ष वेधले. ही प्रसार रॅली पाहण्यासारखी होती त्यात सर्व काँग्रेस व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असून संजय खाडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने संजय खाडे निवडणुकीमध्ये विजय होण्याचे संकेत आहे अशी सर्वत्र चर्चा होती.

सकाळी 10.30 वाजता संजय खाडे यांनी रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा करीत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर प्रचार रॅली ला सुरुवात झाली. यावेळी समर्थकांनी वाजवलेल्या शिट्टीने वणीकरांचे लक्ष वेधले. दु. जैताई मंदिर येथे सांगता झाली. त्यानंतर भांदेवाडा येथे संपूर्ण ताफा रवाना झाला. भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान येथे संजय खाडे यांनी नारळ फोडून ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ झाला.

विधानसभेत वाजणार शिट्टी – संजय खाडे
माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर गावखेड्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अनेक सामाजिक संघटना, संस्था मला पाठिंबा देत आहेत. काँग्रेसचे जवळपास अर्धे अधिक कार्यकर्ते व नेते यांनी मला पाठिंबा दिला आहे. आजच्या रॅलीत देखील मोठ्या प्रमाणात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक शिवसैनिकही रॅलीत सहभागी होते. हा पाठिंबा पाहून यंदा वणी विधानसभा क्षेत्रात शिट्टी वाजणार हे नक्की आहे.

  • संजय खाडे, अपक्ष उमेदवार

भांदेवाडानंतर संजय खाडे व समर्थकांनी वनोजा देवी, घोगुलधरा, वेगाव, वरझडी येथे जाऊन दर्शन घेतले. दरम्यान या मार्गावरील गावांना ताफ्याने भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शुभारंभ कार्यक्रमाला गौरीशंकर खुराणा, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच विश्वास नांदेकर यांचे समर्थक उपस्थित होते. मार्चमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular