Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

लायन्स इंटरनॅशनल द्वारा लायन्स क्लब वणी डायमंड अवॉर्ड ने सन्मानित…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा ‘मानवता अवॉर्ड सोहळा’ धामणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘स्त्री कॅन्सर तपासणी व निदान’ शिबिराचे आयोजन केल्या बद्दल वुमेन्स एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम अंतर्गत लायन्स क्लब वणी ला ‘डायमंड अवॉर्ड ‘तसेच लायन्स क्वेस्ट चा ‘सिल्व्हर अवॉर्ड’ क्लब चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर व सचिव लायन किशन चौधरी यांना देवून गौरविण्यात आले.


मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स क्लब वणी चे वतीने पिस रॅली, ब्लड ग्रुप चेक-अप, गरजूंना अन्नदान, चित्रकला स्पर्धा तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व मान्यवरांचे मार्गदर्शन व स्त्री कॅन्सर तपासणी व निःशुल्क निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


क्लबला डायमंड व सिल्व्हर सन्मान मिळाल्या बद्दल लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव लायन सुधीर दामले तसेच क्लबचे पदाधिकारी व सदस्य लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, महेन्द्र श्रीवास्तव, प्रमोद देशमुख, पुरुषोत्तम खोब्रागडे, मंजीरी दामले, विणा खोब्रागडे, दत्तात्रय चकोर, डॉ के आर लाल, डॉ रविकांत देशपांडे, शमीम अहमद, रमेश बोहरा, शांतीलाल पांडे, नरेंद्र बरडीया, तुषार नगरवाला व खुशी नगरवाला, तसेच वणी परिसरातील मान्यवरांनी लायन्स क्लबच्या मानवता सेवा कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular