Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

संजय खाडे यांना वाढता पाठिंबा….

कामाची पावती जनता मला देणार… जनतेसाठी मी सतत काम केले…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

काँग्रेस च अस्तिव टिकवणारे आणि काँग्रेस पक्षासाठी दिवसरात्र काम करणारे संजय खाडे हे या 2024 च्या विधान सभा निवडणुकी मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलेच नुकसान होणार आहे. असे राजकीय विश्र्लेशकांचे म्हणणे आहे.

वणी विधान सभा क्षेत्रात संजय खाडे यांचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यांनी केलेल्या कार्याची पावती मतदार राजा त्यांना देत आहे. तसेच कुणबी समाज मोठा असल्याने समाज सुद्धा त्यांच्या सोबत आहे. कारण संजय खाडे हे सर्व सामान्य जनतेचे सेवक आहे. त्यांच्या प्रत्येक समस्या त्यांनी सोडविल्या आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगारी, प्रदूषण, शैक्षणिक, आरोग्य असे अनेक कामात त्यानी जनतेला मदत केली. मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा पक्षाचा असो, त्यांचे प्रत्येक सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे मतदारांची पहिली पसंती त्यांना आहे. वणी विधान सभा मतदार संघात कुणबी समाज मोठा असून संजय खाडे यांच्या बाजूने मोठा पाठींबा दिसत आहे.

आपल्या क्षेत्रात सत्तेसाठी उमेदवार वारंवार पक्ष बदलतात. त्यामुळे जे खरंच पक्षाचा झेंडा घेऊन पक्षासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी तळमळीने काम करतात अशाच लोकांसोबत जनता पाठीशी असते. त्यामुळे पक्ष बदलणारे आणि एकनिष्ठ नसणारे उमेदवारा बद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे समाजाची सहानुभूती यांच्या बाजूने कौल देताना दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular