झरी हा अतिशय दुर्गम भाग आहे कोणतीही सुविधा नाही…शेतकरी, बेरोजगार, हे आत्महत्या करत आहे कशा थांबवणार…

AM न्यूज 24 ने घेतलेली विशेष मुलाखत पाहा…
11.11.2024 सायंकाळी 7 वाजता
Raju Umbarkar Speak या यूट्यूब चॅनल वरती….

घरी तालुक्यात कोणत्याही सुविधा नाही अतिशय दुर्गम भाग आहे तेथील तरुणांना शेतकऱ्यांना कामगारांना किती त्रास होतो हे त्यांनाच विचारा माझ्याकडे येतात आणि त्या समस्या सांगतात तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाढते या सत्याधारांना लाजा वाटत नाही म्हणून आपल्या विधानसभा क्षेत्राची परिस्थिती बिकट आहे. मी सोडवणार सगळे प्रश्न ? मी सत्तेत नाही तरीही सगळ्या समस्या सोडवण्याचं काम करतो. मी सत्तेत आल्यावर सगळ्या समस्या संपणार, पूर्ण विधानसभा क्षेत्रात आनंदच आनंद राहणार म्हणून मी कामाचा माणूस आहे.

वणी विधानसभा क्षेत्राची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे. कामाचा माणूस ही मला जनतेने पदवी दिलेली आहे. मी फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी सदैव काम करत असतो. मी पक्षाची एकनिष्ठ आहे सत्तेसाठी पक्ष बदल होत नाही. मी फक्त सहा महिन्यापूर्वी कामाला उतरत नाही किंवा सहा महिने मतदार संघात फिरत नाही. माझ आंदोलन माझ्या शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, आरोग्याचा प्रश्न, माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी, आपल्या परिसरात अनेक अशा समस्या आहे. ज्या समस्येसाठी मी अनेकदा आंदोलने करून तुरुंगात गेलो आहे. या जनतेसाठी एकदा मला जनतेने सभागृहात पाठवा मग पहा तुम्ही आपल्या भागाचा कसा विकास होतो.

ज्यांनी उपजिल्हा रुग्णालय करायला पाहिजे होतं त्यांनी अजून पर्यंत केलेला नाही. आपल्या दवाखान्यात महिला बाळंतपणासाठी येतात. मात्र ते होत नाही त्यांना चंद्रपूरला किंवा नागपूरला पाठवण्यात येत होत, मला समजल्याबरोबर मी आंदोलन करून सर्व अधिकाऱ्यांना भेटून आता इथं बाळंतपण केल्या जाते. त्यांनी कधीच या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, आपल्या वणीच्या रुग्णालयात का होत नाही, सत्ताधाऱ्यांना का समजत नाही की आपण शंभर दोनशे खाटाचे हे रुग्णालय सुरू केलं पाहिजे. प्रदूषणाचा प्रश्न किती आहे, तो प्रश्न मी वारंवार उचललेला आहे, बेरोजगारीचा प्रश्न किती आहे, कोणी विचार करत आज तरुण तरुणाई आत्महत्या करतात कारण काय ? त्यांच्या हाताला काम नाही, शिक्षण बरोबर नाही, शाळा आहे तर शाळेत शिक्षक नाही, शिक्षक आहे तर त्याला नुसते कागद भरवण्यात किंवा नुसत्या मीटिंगसाठी इकडे तिकडे जावे लागते.

शेतकरी तर राबराब राबतो आणि त्याच्या मालाला भावच मिळत नाही आणि या शेतकऱ्यांच्याच नावावर त्यांच्याच भरोशावर हे जगतात त्यांच्याच नावाने राजकारण करतात आणि शेतकऱ्यांच्या पदरी काय पडतं फक्त निराशा आणि म्हणून त्याला आत्महत्या करावी लागते. याला जबाबदार हे सत्ताधारी आहे. त्यामुळेच माझा शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतो आता तरी मी जनतेने विचार करावा मला एकदा निवडून द्या मी सत्तेवर नसताना सुद्धा प्रत्येक समस्या जनतेच्या सोडवत आहे. मी जर सत्तेवर आलो तर आपल्या भागातील जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण नक्की सोडवणार अशी ग्वाही देतो.
राजू उंबरकर यांची विधानसभा निवडणुकी करिता घेतलेली खास मुलाखत पहा..
11.11.2024 सायंकाळी 7 वाजता
Raju Umbarkar Speak या यूट्यूब चॅनल वरती




