Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

तपासणी केली तर झालं काय… कर्मचाऱ्यांनी नियमाचे पालन केले…

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा… निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकी मध्ये वणी शहरात शासकीय मैदानावर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराकरिता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उतरले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर मधील समानची तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांची तपासणी केली असता ते म्हणाले यापूर्वी तुम्ही मोदी, अमित शहा किंवा इतर नेत्यांची तपासणी केली काय तर ते कर्मचारी म्हणाले माझी नियुक्ती वणी शहरात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मी फक्त येथेच माझं कर्तव्य करत आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे. कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आम्ही व आमचे कर्मचारी हे काम करत आहे. त्यामुळे कोणीही याबाबत गैरसमज किंवा संभ्रम करू नये.

सर्वसामान्य जनतेचे वाहन त्यांच्या सामानाची तपासणी रस्त्याने शहरात येताना करण्यात येते तर आपण सुद्धा या देशाचे नागरिक आहे. तर आपली सुद्धा नियमानुसार तपासणी होणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या साहित्याची तपासणी होणे आवश्यक आहे. असे सर्वत्र जनता चर्चा करत आहे. त्यामुळे या विषयाला मोठा बाऊ करण्याची गरज नाही. तपासणी केली तर झालं काय ? अशी सर्वत्र नागरिक चर्चा करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular