Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

लढत कशी होणार… जनता कोणाच्या पाठीशी…

प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात प्रचार खूपच जोमात सुरू असून आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. वणी विधानसभा क्षेत्रात खरी लढत तिरंगी दिसत आहे. 2014 व 2019 मध्ये भाजपकडून निवडून आलेले संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार जोमात सुरू असून शहरी भागातील काही जनता भाजप च्या कामाबद्दल बोलत आहे. मात्र ग्रामीण भागात काही जनतेने गावात आल्यावर रोष व्यक्त केला. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात विरोध दिसत आहे.

कामाचा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले सत्ता असो किंवा नसो जनतेसाठी सतत कार्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेता राजू उंबरकर यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षासोबत व जनतेसोबत एकनिष्ठ राहून सामाजिक कार्य केले आहे. मतदारांचा यावर्षी विधानसभा क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत असून यावर्षी नवीन चेहरा म्हणून तसेच कामाचा माणूस म्हणून आमदार करिता पसंती दाखविण्यात येत आहे. राजू उंबरकर यांनी स्वतः चा मतदार तयार केला असून त्यांनी आरोग्य, शिक्षण, शेतकरी, कृषी, प्रदूषण, महिला सुरक्षा, पाणी प्रश्न असे अनेक प्रश्नासाठी काम केले आहे. त्यामुळे कामाचा माणूस म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

संजय खाडे हे या निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांनी मागील 35 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता पासून सुरुवात केली आहे व जिल्हा सरचिटणीस आणि उत्कृष्ट नेता म्हणून त्यांची विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळायला पाहिजे होती मात्र राजकीय खेळीचा बळी गेला असे म्हणायला हरकत नाही. कारण संजय खाडे यांनी मागील काही वर्षात वणी, झरी, मारेगाव या तीनही तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक नागरिकांची व त्यांच्या घरातील प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहे. या भागातील अनेक समस्या त्यांनी आंदोलनाद्वारे सोडविले आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्याकरिता तळागळातील प्रत्येक व्यक्ती जोडला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून संजय खाडे बाजी मारू शकतात. असे राजकीय विश्लेषक म्हणत आहे. याला कारण म्हणजे मतदार म्हणतात संजय खाडे यांनी समाजासाठी पक्षासाठी जनतेसाठी विद्यार्थ्यांसाठी शेतकरी शेतमजूर महिला आरोग्य असे सर्व प्रश्नांकरिता पुढाकार घेऊन कार्य केले आहे त्यामुळे संजय खाडे प्रबळ दावेदार समजल्या जात आहे.

20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला कोण बाजी मारणार, वणी विधानसभा क्षेत्रात कोणाचा झेंडा फडकणार हे कळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular