अरुण खैरे मुळे कोणत्या पक्षाला नुकसान होईल…
AM न्यूज वृत्तांकन, वणी
वणी विधानसभा मतदार संघांमध्ये निवडणुकीत उभे असलेले बहुजन समाज पार्टीचे अरुणकुमार उर्फ बाळासाहेब खैरे यांच्या उमेदवारीने वणी विधान सभा मतदार संघांमध्ये अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले आहे. बाळासाहेब खैरे हे बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असून त्यांना ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजे समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांचा वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यात प्रचारांचा झंजावात सुरू असून बहुजन समाजाकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाळासाहेब खैरे हे कवी, लेखक, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी विदर्भ बहुजन साहित्य संघाच्या बॅनरखाली हजारो बहुजन मित्रांना एकत्र केले आहे. आता वणी विधानसभा मतदार संघातील जनता वणीतील त्याच त्याच नेतृत्वाला कंटाळली असून आता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशा तयारीत असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडी मध्ये फूट पडल्यामुळे काँग्रेस व उबाठा चे उमेदवार उभे आहेत. बरेच उमेदवार तीन-तीन टर्म पासून निवडणूक लढवित असल्याने मतदार संभ्रमात पडली असून आता मात्र बहुजन नेतृत्व असलेल्या अरुण खैरे यांना भरघोस मतदान देणार असल्याचे कळते. खैरे हे मतदार संघातील संबंधित गावातील प्रत्यक्ष मतदार यांच्याशी संपर्क साधत असल्यामुळे हत्तीचे वजन वाढत असल्याची चर्चा आहे.

प्रचार अंतिम चरणी पोहोचला असून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अरुण कुमार खैरे यांनी विधानसभा क्षेत्रात पक्षाला घराघरात पोहोचवण्याचं काम केलं आहे त्यामुळे वीस तारखेला भरघोस मतदान होईल असे उमेदवार अरुण खैरे यांनी सांगितले आहे.




