Thursday, September 10, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज माधवी लता भाजपच्या प्रचार रॅलीत…

आज प्रचार थांबणार … प्रतीक्षा मतदानाची….

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माधवी लता सोमवारी वणीत
शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवार दी. 18 नोव्हेंबर ला महायुती उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे प्रचारार्थ शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तेलंगणा राज्यातील भाजप नेत्या माधवी लता संबोधित करणार आहे. येथील शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ सकाळी 11 वाजता रॅली निघणार आहे. मतदार संघातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ता या सभेसाठी उद्या शहरात दाखल होणार आहे.

माधवी लता यांनी हैद्राबाद मधून एआयएमआयएम चीफ असदुद्दीन ओवैसी विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती. भाषणाच्या शैलीमुळे लता माधवी यांची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग 2 वेळ निवडणूक जिंकली असून हॅट्रिकच्या तयारीत आहे. जनतेला सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय मागील 10 वर्षात त्यांनी कोट्यवधीची निधी विकासकामांसाठी खेचून आणली आहे. महायुतीची प्रचार रॅली व जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन महायुती कडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular