भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुसंडी मारणार….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी ठरविले आहे की विळा उंबईच वीजयी होणार आहे. मग धनशक्तिच्या बळावर शक्तिप्रदर्शन करून काय उपयोग असा जनमानसात प्रश्न आहे. मतदारसंघात संपुर्ण 350 गावात तिसरी भेट देणारा एकमेव उमेदवार कॉ.अनिल हेपट आहे. ज्याचे रिकॉर्ड दुसरा कोणता उमेदवार मोडु शकला नाही. विजय विळा उंबईचाच आहे फक्त मार्जीन वाढविण्याची तयारी मतदारांनी सुरू केली आहे.

सर्व उमेदवारावर मुसंडी मारत कॉ.अनिल हेपट आणी सर्व सर्कल मधील कार्यकर्त्यांनी तिसरया फेरीतील तिन दिवसासोबत काल झालेल्या भालर, परसोडी, बोरगाव, सुर्दापुर,बमांगरूळ, कोलगाव, उकणी, भालर कॉलनी, शिंदोला, जानकाई पोड, बोटोणी, उभारघाट, दाभा, मारेगाव, वेगाव, धामणी, गोंडबुरांडा, पहापळसहीत 240 गावात भेटी दिल्यात. जे रिकॉर्ड आहे. ग्रामीण भागातील प्रचंड प्रतिसाद बघता शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार आज सकाळपासून कॉ.अनिल हेपट वणी शहरात पदयात्रा काढुन शहरवासीयांना भेटी देत आहेत.




