वणी तालुक्यातील उमरी जवळील घटना…. अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
- आय टी आय करून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी 5 वाजता सुमारास उमरी मार्गांवर घडली.
उमरघाट येथील राजकुमार (वय 20) हा वणी येथील आय टी आय करत होता, आज सुद्धा आय टी आय करून दुचाकीने उमरीघाट गावाकडे निघाला. अशातच कायर मार्गे भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उमरी गावानजीक दुचाकीला जबर धडक दिली. यात उमरी येथील राजकुमार दडांजे जागीच ठार झाला. वृत्त लिहेपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाली नसल्याचे माहिती आहे.











