Thursday, October 15, 2026
Google search engine
spot_imgspot_img

निकालाची चर्चा सुरू… बालेकिल्ला कोणाचा ?

मनसे, भाजप, मशाल की शिट्टी कोण मारणार बाजी ?

AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्राचे मतदानाची टक्केवारी 74.87 झाली असून सर्वत्र चर्चेला आता उधाण आली आहे कोण जिंकणार शहरात आणि ग्रामीण भागात जो ज्या उमेदवाराच्या बाजूने आहे त्या बाजूने तो इतक्या मताने जिंकणार अशी चर्चा सुरू असून आता यावर सट्टा लागलेला आहे.

अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना सर्वांनी हलक्यात घेतलं होतं, मात्र ग्रामीण भागातील जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. संजय खाडे महाविकास आघाडी कडून उमेदवार म्हणून उभे असते तर संजय खाडे यांचा विजय नक्की झाला असता असे सर्व जनता चर्चा करत आहे. मात्र आता अपक्ष उभं झाल्यामुळे त्यांना माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र पाटील, वासुदेव विधाते, प्रमोद वासेकर आणि कुणबी समाजाची भरपूर साथ मिळाली आहे, तसेच त्यांनी मतदार संघात केलेल्या कामाची दखल मतदारांनी घेतली. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळू शकते. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. संजय खाडे यांनी विजय प्राप्त केला तर एक इतिहास नक्कीच घडणार यात मात्र शंका नाही.

मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यावेळी या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर असून शहरात आणि ग्रामीण भागात त्यांनी केलेल्या कामाचा विचार करून नवीन उमेदवार व तडफदार आमदार व्हावा असे जनतेला वाटत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात जनतेसाठी सदैव धावत जाणारे राजू उंबरकर यांना मतदारांची पसंती दिसत आहे.

शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना यावेळेस संधी मिळावी आणि कुणबी समाजाची साथ, काँग्रेस पक्षाची मदत, शिवसेनेचा मोठा मतदार असल्याने विजय होऊ शकतो. मतदानाच्या दिवशी मशाल ला मतदारांनी मतदान मोठ्या प्रमाणात केले आहे, असे त्यांचे समर्थक व ग्रामीण भागातील जनता सांगत आहे. त्यामुळे यावेळी मशाल चा विजय 100 टक्के होणार अशी चर्चा नागरिक करत आहे.

2014 पासून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा क्षेत्रात जनतेच्या मनात आपली जागा निर्माण केली असून त्यांनी विकास कामे केले आहे. भाजप चे समर्थक मोठ्या प्रमाणात वणी विधानसभा क्षेत्रात असल्याने त्यांना तिसऱ्यांदा विजय प्राप्त नक्की होईल, असे मतदारसंघात बोलल्या जात आहे.

या चौरंगी लढतीमध्ये कोणामुळे कोणाचा फायदा होईल हे आपल्याला 23 तारखेला होणाऱ्या निकालाच्या दिवशी समजणार आहे. त्यामुळे वणीचा बालेकिल्ला भाजपकडे शाबूत राहतो, की मनसे, मशाल, शिट्टी यांच्याकडे जाणार काय ? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular