निवडणुकीची चुरस वाढली… दोन्ही संजय ची कार्य प्रणाली गतिशिल…
AM न्यूज वृत्तांकन, वणी
विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावरच आलेली असल्याने आणि लोकसभेचा धक्कादायक निकाल लागल्याने अनेकांना चित्र पलटणार असे वाटत आहे. त्यामुळे वणी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न सगळ्या जनतेला व पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पडलेला आहे.

मागील काही महिन्यापासून शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर जोमाने पक्षासाठी कार्य करत आहे. मात्र पक्ष संजय देरकर यांना उमेदवारी कोणत्या कारणाने देतील. 1. आर्थिक बाजू मजबूत असल्याने 2. पक्षासाठी काही महिन्यापासून कार्य करत असल्यामुळे 3. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना 25000 मतदान मिळाल्याने 4. राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा अनुभव असल्याने शिवसेना पक्ष उमेदवार घोषित करतील का असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी बाजू जनतेत कार्य मोठ्या प्रमाणात नाही, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही मोठे आंदोलन नाही. सामाजिक कार्यात सहभाग कमी, गोरगरिबांना व सामाजिक आर्थिक मदत कमी असल्याने जनतेत लोकप्रियता नाही. असे नागरिक सर्वत्र चर्चा करतात.

महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार ज्यांचं नाव सामाजिक कार्यात शैक्षणिक क्षेत्रात गरिबांना मदत करणे, सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान तसेच विविध आंदोलने, तळागाळातील सामान्य माणसात, जनतेत असलेला दांडगा जनसंपर्क, आर्थिक दृष्ट्या सक्षम, 35 वर्षाचा राजकीय अनुभव, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांना उमेदवारी पक्ष देण्यास तयार होईल का ?
संजय खाडे यांची दुसरी बाजू म्हणजे जुने नेते व कार्यकर्ते यांना सहकार्य करतील का ? पक्षाची गट बाजी सर्वत्र दिसत आहे. पक्षश्रेष्ठी कडे येथील स्थानिक नेते संजय खाडे यांच्या नावासाठी पुढाकार घेतील का ? हा प्रश्न सुद्धा जनतेत चर्चे दरम्यान सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या मनात कोणते संजय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार हे राजकीय क्षेत्रात मुरब्बी व्यक्तिमत्व असल्याने स्वतःला उमेदवारीसाठी प्रयत्न करतील किंवा वारसा चालवण्यासाठी प्रयत्न करतील किंवा तरुण तडफदार नवीन चेहरा उमेदवारीसाठी पक्षासमोर नाव समोर करतील असे राजकीय विश्लेषक यांनी मत मांडले आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देरकर की काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांना उमेदवारी मिळणार की नवीनच चेहरा समोर येणार हे आपल्याला अधिकृतरित्या नाव येऊन सगळ्यांना धक्का देणार हे मात्र वेळेच सांगणार आहे.




