फूटपाथ वाले नाली सोडून रस्त्यावर करतात अतिक्रमण… त्यामुळे रस्ता झाला छोटा…. लक्ष कोण देणार ?
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरांमध्ये नगरपालिका ही फक्त नाममात्र आहे का ? असे चित्र वणी शहरात दिसत आहे. साई मंदिर चौक ते टिळक चौकापर्यंत फूटपाथ सोडून भर रस्त्यावर साई मंदिर चौकात फळवाले, फुलवाले त्यानंतर या रस्त्याने चायनीजच्या गाड्या, पंचर दुरुस्ती करणारे टायर चे दुकान, चिकन वाले, रस्त्यावर असणारे ऑटो, बंद असलेल्या कार यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र नगरपालिका यांच्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

वणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर या फुटपाथ वर दुकान लावून बसणाऱ्याची अर्धी जागा झाली का ? किंवा यांना मालकी हक्काने दिली की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

या फुटपाटवाल्यांना कोणी हटकल्यास यांची दादागिरी दिसत आहे. यांना नगरपरिषद अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. साई मंदिर चौकामध्ये रस्ता पूर्ण अरुंद झाला असून मोठा अपघात झाल्या नंतरच प्रशासनाला जाग येणार का ? या चौकामध्ये वारंवार लहान लहान अपघात झालेले आहे, मात्र प्रशासनाने त्याची अजून पर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फुटपाथ वाल्यांना एखाद्या व्यक्ती चा मृत्य झाल्यावर यांच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.




