Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस वणीत अभिवादन… गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप…

नगर सेवा समितीचा पंधरा वर्षापासून स्वच्छतेचा उपक्रम सुरू…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या तर्फे गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.

गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजया दहेकर, विजय चोरडिया, किरण देरकर, सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी समाजाला गाडगे बाबांच्या विचारांची,शिक्षणाची व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज आहे. असे संत गाडगेबाबांच्या जीवन चरित्र्याची महती सांगितली.

यावेळी गीता ताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पा भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके, बेबी थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके, रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले, राजु तुराणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे, भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धवांजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार , नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर , विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके उपस्थित होते.

स्मारक स्थळी वृक्षारोपण..

आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular