Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

चंद्रपूर येथे भारतीय मजदूर संघाचे श्रमिक कामगार अभियान…

AM न्यूज वृत्तांकन…

चंद्रपूर :- मातृ संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असलेला भारतीय मजदूर संघ 70 वर्ष पूर्ण करत आहेत. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी आपले जीवन कामगार हितार्थ समर्पित केले कायम,कंत्राटी,संघटित,असंघटीत कामगारांचे नेतृत्व करत शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रहित उद्योगहित कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करत त्याग तपस्या आणि बलिदान देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले. आज दोन कोटी पेक्षा सदस्य संख्या असलेले देशातील मजबूत व बलाढ्य असे हे संघटन आहे.

भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाने १७ डिसेंबर ला भारतीय मजदूर संघ कार्यालय चंद्रपूर येथे श्रमिक संपर्क कामगार अभियान आयोजित केले असून तळागाळातील शोषित पीडित वंचित वीज उद्योगातील महानिर्मिती व महावितरण मध्ये कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यां जाणून घेवून कामगारांशी संवाद साधण्याकरीता संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात यांच्या सह संघटनेचे नागपूर पदाधिकारी यांनी उपस्थित दर्शविली.

कोरोना काळात आघाडी सरकारने नेहमी प्रमाणे या वीज कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष केले.

जनतेला वीज सेवा देताना अनेक कामगार शहिद झाले, अनेक कंत्राटदारांनी शासकीय संविधानिक देण्याची लूट संगनमताने केल्याने कामगारांचे करोडो रुपये लुटले गेले.मात्र आघाडी सरकारने नेहमी प्रमाणे या वीज कंत्राटी कामगारांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले.

महायुती सरकारच्या अडीच वर्षे कार्यकाळात संघटनेने विधानसभा मुंबई नागपूर, आझाद मैदान, मंत्रालय, नागपुरात येथे आंदोलन करत संघर्ष केल्यामुळे तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना दिवाळीत पगार, बोनस, 19% पगार वाढ, या पगारवाढीचा फरक, तसेच भरतीमध्ये वयात 45 वर्षापर्यंत सवलत, जादा 10 गुण, अपघाती मृत्यू पश्चात वारसाला 4 लाख आर्थिक निधी, 5 लाख रुपयांचे विमा कवच, राष्ट्रीयकृत बँकेत वेतन खाते, आय टी आय करण्यास मुदत वाढ व नोकरीत थोडे संरक्षण असे अनेक लाभ 42000 कंत्राटी कामगारांना संघटनेने सरकार विरोधात संघर्ष मिळवून दिल्याने कामगार वर्ग खुश झाला.

माजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री सुरेश खाडे व अपर प्रधान सचिव ऊर्जा, तिन्ही वीज कंपनी प्रशासनाचे संघटनेला विशेष सहकार्य लाभले. पुणे येथे झालेल्या प्रदेश कार्यकारणी मध्ये नवीन स्थापन झालेल्या सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संघटनेने पारित केला.

नवीन सरकार मधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात संघटनेला नक्कीच सकारात्मक सहकार्य करून बदमाश कंत्राटदारावर कारवाई, कंत्राटदार विरहित रोजगाराच्या हरियाना पॅटर्न,जॉब सिक्युरिटी, तिन्ही कंपनीत समान वेतन,भरतीमध्ये प्राधान्याने आरक्षण व अन्य अनेक प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे महावितरण विभागीय संघटनेचे सर्कल अध्यक्ष अंकुश डोंगरवार महानिर्मिती विभागीय संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सिंग बिहान सह संतोष निकूरे, स्वप्निल तरारे, जितेंद्र काळे,संघपाल धोटे, विकास अडबले, मिथुन गायकवाड, मंगेश जोगी, दिपक उमरगुंडावार, नितीन माहकुलकर, राकेश खोके ,दिलीप भगत सही बल्लारशाह,वरोरा चंद्रपूर तालुक्यातील महावितरण विभागातील असंख्य कंत्राटी कामगारांची उपस्थित होती कार्यालय यशस्वी करण्याकरीता संघपाल निमसटकर , महादेव सिडाम यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular