विजय चोरडिया यांचे समर्थक व कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य हे राजकीय क्षेत्रामध्ये अनुभवी असून प्रामाणिक कार्य करत असतात. भारतीय जनता पार्टीने एका सच्चा कार्यकर्ता व भाजपचे पुढारी असणारे विजय चोरडिया यांना भाजपच्या वणी विधानसभा क्षेत्र सदस्य नोंदणी प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजप तर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यवतमाळ येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व बैठक संपन्न झाली असून जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यशाळेला जिल्यातील भाजपचे सर्व आमदार तसेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कार्यशाळेत सदस्य नोंदणी बाबत चर्चा करण्यात आली. विजय चोरडिया यांचा शहरासह ग्रामीण भागात असलेला दांडगा जनसंपर्क असल्याने विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचे नाव अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदस्य नोंदणी ची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.

मी माझ्या पक्षाचे प्रामाणिक काम करत आहे आणि सदैव पक्षासोबत प्रामाणिक काम करत असतो म्हणून माझी पक्षाने या कार्याकरिता मला ही जबाबदारी दिलेली आहे. विधानसभा क्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत मी संपूर्ण घराघरात भाजप पोहोचवणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, सर्वधर्मपंथात मी नि:स्वार्थपणे कार्य करतो. तसेच माझे कार्य जनतेसाठी असते हे सर्वांना माहिती आहे. होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका संपन्न होणार आहेत आणि विधानसभेत पक्षाचा पराभव झाला असला तरी आगामी निवडणूकि मध्ये भाजप हा हिशोब नक्कीच चुकता करणार आहे. मला दिलेली जवाबदारी यशस्वीरित्या पार पाडीन, असे विजय चोरडिया म्हणाले.

विजय चोरडिया यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय माजी खासदार हंसराज अहिर यांना दिले. जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, कॅबिनेट मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, मदन येरावार, नितीन भुतडा इत्यादी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.





