Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

लोहार समाजाचा भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा संपन्न …

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी


सालाबाद प्रमाणे वणीतील तिरुपती मंगल कार्यालय येथे भव्य लोहार समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा संपन्न झाला. यावेळी वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
या दोन दिवसीय मेळाव्यात पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा, महिला साठी रांगोळी स्पर्धा व विविध कार्यक्रम घेण्यात आले.


दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम वधू-वर परिचय व समाज बांधव परिचय मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार संजय देरकर, जि. काँ. उपाध्यक्ष इजहार शेख. वै,गा,लो,व त,जाती महासंघ नागपूर चे पदाधिकारी व पडघम, पिएसआई प्रमोद मेश्राम, बावने, कोसरे, बांगडे तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जगन जुनगरी, भगवान मोहीते व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


महासंघाचे माजी युवा अध्यक्ष माणिक शेंडे व जितेश मेश्राम, संपादक दै.प्रहार मधुकर शेंडे, पिएसआई जमनादास सोनटक्के, सुरेश मांडवगडे यांनी आपले विचार समाजासमोर ठेवले.
यावेळी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक आमदार संजय देरकर यांनी आपले विचार मांडले व संघटनेच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले. पूर्णशक्तीनीशी संघटनेच्या पाठीशी उभे राहायचे त्यांनी वचन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सल्लागार दिनकर निंदेकर होते तर विशेष योगदाना बदल बाबाराव चट्टे यांचे आभार मानले.


प्रास्ताविक रमेश झिंगरे, संचालन अनिल कांबळे तर आभार संघटनेचे अध्यक्ष नितीन धाबेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघटनेचे महिला अध्यक्ष छाया निंदेकर, सल्लागार बंडू निंदेकर , संजय गाताडे कार्याध्यक्ष राहुल चट्टे, उपाध्यक्ष रवी गाताडे, निलेश सोनटक्के, सचिव तथा महासंघ जिल्हाध्यक्ष शिरीष क्षिरसागर, सहसचिव आकाश खंडाळकर, कोषाध्यक्ष प्रशांत सोनटक्के, युवाध्यक्ष संतोष सावरकर, संदिप वाघाडे, पवन खंडाळकर, सुधिर खंडाळकर, विलास खंडाळकर, धनंजय वासेकर, तुषार कांबळे, राकेश मांडवकर, दिनेश खंडाळकर, मिथलेश वाघाडे, योगेश वाघाडे, दशरथ गिरडकर, जयश्री चट्टे, कीर्ती सुर्तेकर, अमृता चट्टे, पुजा केळकर, सुवर्णा क्षिरसागर, संध्या मेश्राम, यासह अनेकांनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular