प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
दि .2 फेब्रु 2025 रोजी धनोजे कुणबी समाज सांस्कृतीक भवन येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर, सहसचिव अंबादास वागदरकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

यावेळी जयप्रकाश राजूरकर , सुधाकर गारघाटे , प्रभाकर गौरकार , नारायण ढवस , किशोर मिलमिले , व्यवस्थापक कवडु नागपूरे उपस्तीथ होते. आभार संस्थेचे कोषाध्यक्ष रामराव गोहोकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या वेळी संचालक मंडळाचे सदस्य व सर्व समाजबांधव कार्यक्रमाला उपस्तीथ होते.





