नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे मागील तीन महिन्यापासून हाताला काम नसल्याने परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा यक्ष प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे वणी नगर परिषद मार्फत आम्हाला काम देण्यात यावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशा आशयाचे निवेदन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नेतृत्वात शेकडो कंत्राटी कामगारांनी मुख्याधिकारी नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय , पोलीस प्रशासन वणी व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना दिले आहे.

प्रशासनासोबतच भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचेकडे निवेदनाची प्रत देऊन कंत्राटी कामगार हाताला काम मागत असल्याने नगरपालिका प्रशासन आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांना किती दिवसात काम देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवेदन देतांना मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार उपस्थित होते.




