Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

अंगावर वीज पडून शेतकरी ठार…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

झरी जामणी : शेतात काम करताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडली.

वसंत नरसिंग चव्हाण (वय 40) असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक शेतकरी हा शेतात काम करीत होता. आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात हलक्या माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अशातच आकाशात विजेचा गडगडाट होवून शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी चव्हाण हे जागीच ठार झाले. मृतक वसंत याच्या पाठीमागे आई वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular