Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

संगीत, नाट्य, नृत्य महोत्सव संपन्न.. संत गजानन महाराज महानाट्य पाहून रसिक भारावले…

मराठी नववर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

गुढी पाडवा व मराठी नववर्षानिमित्त श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी यांच्या द्वारे सांस्कृतिक संगीत व नाट्य महोत्सव संपन्न झाला. श्री रंगनाथ स्वामी कला केंद्राचे विद्यार्थी यांनी श्री जगन्नाथ महाराज यांच्या जीवन चारित्रावर आधारित गिते सादर केली. यावेळी जगन्नाथ महाराजांची झाकी मुळे श्रोत्यांचे लक्ष वेधुन घेतले. साक्षात जगन्नाथ महाराज भेटीला आले असा भास श्रोत्यांना झाला.

हेमंत चौधरी व पुरुषोत्तम गावंडे यांनी रसिक श्रोत्यांना आपल्या हास्य दर्पण कलेतून हसवून हसवून लोटपोट केले.
नागपूर येथिल स्वरमंथन बहुद्देशिय संस्था द्वारा प्रस्तुत शेगावीचा संत गजानन हे महानाट्य श्रोत्यंसाठी खास मेजवानी ठरली. हे महानाट्य पाहून वणीकर रसिक श्रोता भक्तीमय झाले आणि अतिशय सुरेख महाराजांचे महानाट्य झाल्याचा आनंद रसिकांनी केला.

या कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या महोत्सवासाठी सविता डोर्लिकर, विना मोहितकर, डॉ संचिता नगराळे, सुचिता आवारी, वंदना पिंपळकर. कान्होपत्रा खंडाळाकर, भाग्यश्री तोडेवार, संतोष जोशी, सतीश बाविस्कर , अरुण डवरे, संतोष किंगरे, हेमंत चौधरी, अजित खंदारे यांच्या सह सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular