तब्बल ११ वर्षांनंतर नवीन लालपरी मिळाल्याने कर्मचारी वर्गात आनंद … नागपूर, अमरावती, अकोला गावा करिता नवीन गाड्या असाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी आगाराला नवीन लालपरी बसेस मिळवण्याकरिता
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने १५ दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता मात्र आता परिवहन मंत्र्यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मागणीची दखल घेतली असून वणी आगाराला नवीन ५ बसेस मिळाल्या आहे. मंगळवारी एक बस आली आहे.

आज सकाळी 6.00 वाजता दापोली येथून नवीन लालपरी बस वणी आगारात दाखल झाली असून उर्वरित एक बस वणी आगारात पोहोचणार आहे अशी माहिती प्राप्त झाली असून आज नवीन लालपरी बसेस चा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
नागपूर, अमरावती, अकोला अशा लांब पल्ल्याच्या गावाकरिता नवीन लाल परी बसेस चालवाव्यात अशी अपेक्षा प्रवाशी करत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या संपूर्ण जुन्या झाल्या असून प्रवाशांना प्रवास करतांना खूप त्रास होतो आहे. त्यात त्यांची बसायची इच्छा नसते, अशी नागरिक चर्चा करत आहे. त्यामुळे वणी आगारांमध्ये आलेल्या नवीन लाल परी बसेस लांबपल्ला करिता लावल्यास प्रवास सुखाचा होईल, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

तब्बल ११ वर्षांनंतर नवीन लालपरी मिळाल्याने कर्मचारी वर्गात आनंद,
वणी आगारातील लालपरी बसेस ची दैन्यावस्था झालेली आहे, जिथे तिथे रस्त्यावर बंद पडत असल्याने चालक, वाहक तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र आता वणी आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या असून आज मंगळवारी दुपारी एक लाल परी दाखल झाली आहेत तब्बल ११ वर्षांनंतर नवीन लालपरी बस दाखल झाल्याने आगारातील कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.





