भारतीय सैन्यात पदावर असणाऱ्या व्यक्ती कडून प्राणघातक हल्ला….. अशोभनीय वर्तवणूक
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
श्री विनायक मंगल कार्यालय समोर एका वेल्डिंग व्यावसायिकाला भरदुपारी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. पत्नी सह लग्न कार्याला जात असताना लग्नाची वरात रस्त्यावर असल्याने चारचाकी गाडी समोर घेता येत नसल्याने त्यांनी गाडी मागे घेताना थोडासा धक्का लागल्यामुळे दुचाकी धारकाने त्यांना दगडाने मारले. पहिले दगडाने काच फोडला व नंतर दगडाने डोक्यावर प्रहार केला व दुसऱ्या प्रहार आला त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे सुरेश आसुटकर यांचा जीव वाचला अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती. त्यामुळे आरोपी विरोधात याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेपेरा रोड वर सुरेश भुवाजी आसूटकर (वय 57) रा.वणी यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. दि.5 मे रोजी ते गाडीने पत्नीसह मुकुटबन रोड वरील श्री. विनायक मंगल कार्यालयात लग्नासाठी जात होते. मंगल कार्यालयासमोर वरात आणि बँड रस्त्यावर असल्याने गाडी समोर घेता येत नव्हती, आरोपी शंकर श्रावण थेरे (36) रा. गणेशपूर, ता वणी याने दगड मारून जखमी केले व शिवागीळ करून लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच जावेत मारण्याची धमकी दिली. वाहन क्र. (एम एच 29,सी जे 0497) ची त्याने काच फोडून अंदाजे किंमत 30000/- रुपये चे नुकसान केले. ही घटना दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. या घटनेची सुरेश आसूटकर यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारी व मेडिकल रिपोर्ट वरून पोलिसांनी बि एन एस नुसार कलम 125(a), 324(4),352,351(2) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.का. संतोष आढाव करत आहे.





