Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

फक्त अभ्यास एके अभ्यास नाही… तरीही तिनही तालुक्यातून प्रथम….

पुन्हा मुलींनीच मारली बाजी….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

दरवर्षी मुलीच दहावी व बारावी मध्ये बाजी मारतात आणि याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी दहावीचा निकाल घोषित झाला आणि वणी शहरातील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी अनुराधा अरविंद महालक्ष्मे या विद्यार्थिनीने तिन्ही तालुक्यातून दहावीच्या निकालामध्ये 98.20 टक्के घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

अनुराधा ही फक्त अभ्यास एके अभ्यास करत नाही तर शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात स्पर्धेत, भाषण, नृत्य, कला आणि इतर स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक प्राप्त करते. मात्र अभ्यास नियमित करायचा त्यासोबतच इतर क्षेत्राचाही अभ्यास करायचा ही तिची कुशलता आहे. त्यामुळे अनुराधा हीने हे घवघवीत यश संपादन करून आपल्या आई वडील, आजी आजोबा यांचे नाव मोठे केले आहे. सेवानिवृत विस्तार अधिकारी महालक्ष्मे यांची नात असून तिच्या यशाचे श्रेय तिची आजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वैशाली काशीकर, वडील अरविंद महालक्ष्मे व नागपूर येथे शिक्षिका असलेली तिची आई गायत्री महालक्ष्मे व सर्व शिक्षक यांना देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular